सांगली : वाळव्याचा "वाघ" म्हणून ज्यांची आजही ओळख आहे; ते म्हणजे स्वातंत्र्य सैनिक (Saluting Bravehearts) क्रांतिवीर (revolutionary) नागनाथ आण्णा नायकवडी (Nagnath Anna Naikwadi). ब्रिटिश साम्राज्याला हादरून सोडणारे (who shook the power of the British) स्वातंत्र्य सैनिक म्हणून नागनाथ आण्णा यांच्याकडे पाहिले जाते. पत्री अर्थात प्रतिसरकार चळवळ बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी अशी नागनाथ आण्णांची कारकीर्द राहिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्याच्या (Indian Independence Day) इतिहासात सोनेरी अक्षराने नागनाथ आण्णा नायकवडी यांचे नाव लिहले जाते.
ब्रिटिश सरकारला 'सळो की पळो' करून सोडण्याचे काम, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी केले होते. वाळव्याचे सुपुत्र असणारे नागनाथ नायकवडी यांचा जन्म 15 जुलै 1922 रोजी झाला होता. लहानपणापासून नागनाथ आण्णा स्वातंत्र्यलढ्यासाठी काम करत होते. तारुण्यात 1942 च्या लढ्यात नागनाथ आण्णांनी स्वातंत्र्य लढाईच्या युद्धात स्वतःला झोकून दिले. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात ब्रिटिश सरकारला आव्हान देणारे एक नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या रूपाने निर्माण झाले होते. आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विश्वासू आणि अत्यंत जवळचे म्हणून नागनाथ आण्णा नायकवडी यांची ओळख झाली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचे नेतृत्व देखील नागनाथ अण्णा नायकवडी करत होते. नागनाथ नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांचा धुळ्याचा खजिना असेल किंवा तत्कालीन सातारा जिल्ह्यातल्या शेणोली येथील ब्रिटिश सरकारची पे स्पेशल लुटण्याचे धाडसी कामगिरी नागनाथ अण्णा नायकवडी व जी.डी बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली झाली होती.
ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रतिसरकार स्वातंत्र्य लढ्यात गनिमी काव्याने लढाई चालू झाली होती. जवळपास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात निधीच्या खोऱ्यापासून कृष्णा वारणा खोऱ्यापर्यंत प्रतिसरकार ब्रिटिश सरकारच्या विरोधात आव्हान देत होते. पण सत्ता प्रतिसरकार चालवण्यासाठी आवश्यक्ता होती, ती पैशांची. ही गरज पूर्ण करण्यासाठी नागनाथ आण्णा नायकवडी आणि जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारचा खजिना लुटण्याची योजना आखण्यात आली.
7 जून 1943 रोजीचा दिवस उजाडला :नागनाथ आण्णा नायकवडी आणि जी.डी.बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटीशांची मिरजेतून-पुण्याकडे जाणारी 'पे स्पेशल'ट्रेन म्हणजे पगाराची ट्रेन लूटली होती. गनिमीकाव्याने सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सीमेवरील शेनोली येथे 'पे स्पेशल' ट्रेनला थांबवत, ट्रेनवर हल्ला बोल करत, ट्रेन मध्ये असणारे, ब्रिटिश सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगाराचे पैसे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लुटण्यात आले होते. यानंतर ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले होते.
त्यानंतर ब्रिटिश सरकारला 15 एप्रिल 1944 रोजी आणखी एक हादरा देण्यात आला. तो म्हणजे धुळ्याचा खजिना लुटीचा. ब्रिटिश सरकारचा साडेपाच लाख रुपयांचा खजिना घेऊन जाणारी गाडी नागनाथा आण्णा नायकवडी आणि जी.बापू.लाड यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिकांनी लूटली होती. नवनाथ अण्णा नायकवडी आणि जीडी बापू लाड आहे हे दोघेही रस्त्यावर भांडण्याचे नाटक करू लागले आणि त्यातून ब्रिटिश सरकारची गाडी थांबली आणि त्यानंतर डाव साधून नागनाथ आण्णा नायकवडीनी ब्रिटिश सरकारच्या खजिनेच्या गाडीवर असणाऱ्या चालकाच्या छाताडात गोळी मारली होती. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश सरकारचा पैशाचा खजिना लुटला होता. ब्रिटिश सरकारचा पोलीस फौज फाटा स्वातंत्र सैनिकांच्या मागे लागला. एका गावात या पोलिसांनी ब्रिटिशांनी नागनाथ नायकवडी व स्वातंत्र्यसैनिकांना गाठले देखील. त्यावेळी नागनाथअण्णा नायकवडी आणि जीडी बापू लाड यांनी आपल्या सहकाऱ्यांना खजिना घेऊन पुढे जाण्याचे सांगितले. त्यानंतर नकळत नायकवडी व जीडी बापू लाड या दोघांनी ब्रिटिशांच्या पोलीसांना बंदुकीच्या जोरावर रोखून धरले. प्रचंड गोळीबारामध्ये ब्रिटिश पोलिसांची एक एक गोळी नागनाथ नायकोडी यांच्या खांद्याला चाटून गेली तर एक गोळीबापू लाड यांच्या पिंड्र्यातून आरपार झाली. मात्र दोघांनीही 25 ते 30 पोलिसांना हैराण करून सोडले होते आणि अखेर अंधाराचा फायदा घेत नागनाथ नायकवडी आणि बापू लाड हे दोघे पसार होण्यात यशस्वी झाले.
बंदुकीच्या जोरावर ब्रिटिश सरकारच्या होणाऱ्या अत्याचाराला बंदुकीनेच उत्तर या ध्येयाने नागनाथ अण्णा पछाडले होते, कारण ही तसेच होते. तासगाव या ठिकाणी मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकवण्यात आला होता. त्यावेळी ब्रिटिश सरकारने केलेल्या गोळीबारात दोघेजण शहीद झाले होते. या घटनेमुळे नागनाथ आण्णा व्यथीत झाले. मग त्यांनी निश्चय केला, ब्रिटीश सरकारला बंदुकीनेच उत्तर द्यायचे. आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी हाती शस्त्र घेण्याचा पक्का निर्धार करत, बंदूक मिळवण्यासाठी पहिल्यांदा कोल्हापूर गाठले. पण बंदूक मिळाली नाही. तेथून आण्णांनी गडहिंग्लज गाठले. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशा आली. या दरम्यान गोवा येथे बंदूक मिळू शकते,ही माहिती मिळाल्यावर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी थेट गोव्याचा रस्ता धरला. वाटेत बांद्यात त्यांना गोव्यातील बंदुकीच्या तस्करीबाबत माहिती मिळाली. अखेर गोवा गाठून नागनाथ नायकवडी यांनी पोर्तुगीजांची सत्ता असणाऱ्या गोव्यातून दोन इटालियन बनावटीच्या रिवाल्वर विकत घेतल्या. पण परतत असताना ती वाट सोपी नव्हती. पोर्तुगीज्यांच्या आणि भारताच्या सीमेवर प्रचंड पोलीस बंदोबस्त असायचा, मात्र नागनाथ अण्णा नायकवडी यांनी पोलिसांना चकवा देत डोंगर दर्यातून वाट काढत, दीड महिन्याच्या कालावधीनंतर बंदूक घेऊन वाळव्यात दाखल झाले होते.
नागनाथ अण्णा नायकोडी यांनी स्वातंत्र्य लढ्यानंतर देखील स्वतःला समाजकार्यात झोकून दिले होते. गोरगरिबांच्यासाठी ते नेहमीच मदतीला धावून जायचे. त्यातूनच गोरगरिबांच्या हाताला काम मिळावे, म्हणून अनेक संस्था देखील उभा केल्या. संयुक्त महाराष्ट्राची चळवळी, दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी संघर्ष देखील नागनाथ अण्णांनी केला. राजकारणात देखील नागनाथांनी उडी घेतली होती. 1962 दरम्यान ते आमदार देखील राहिले होते. शेवटच्या श्वासापर्यंत नागनाथ आण्णा हे गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी लढत राहिले,अशा या थोर स्वातंत्र्यसेनानी, क्रांतीवीर, पद्मभूषण नागनाथ आण्णा नायकवडी यांनी वयाच्या 89 व्या वर्षी 22 मार्च 2012 रोजी अखेरचा श्वास घेताला.
हेही वाचा :Indian Independence Day : चिमुर क्रांतीत 21 क्रांतिकारकांना फाशी; वाचा चिमुर क्रांतीचा रक्तरंजीत इतिहास