सदाभाऊ खोत आणि किरीट सोमय्यांची शरद पवारांसह आघाडी सरकारवर घणाघाती टीका.. - सांगली किरीट सोमय्या बातमी
राज्यातील शेतकरयांची अवस्था फार बिकट आहे. अनेक अडचणी शेतकऱ्यांना आहेत,द्राक्ष बागा झोपला आहे. कांदा शेतकऱ्यांची वाट लागली आहे. पण सरकारची मदत मिळत नाही. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना हर्बल तंबाखु पेरा करण्याचा परवानगी द्यावी. विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर आणि आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांना "हर्बल शेती" बियाणं देण्याची मागणी करणार आहे. ज्यामुळे शेतकरयांची गरीबी हटेल.
सांगली - शरद पवार यांच्या मध्ये कोणती स्पेअर पार्ट घातले ? हे ब्रह्मदेवांना आपणा वर गेल्यावर विचारणार,अशी खोचक टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तर धर्माच्या आणि रामच्या नावाने मतं मिळवून आता"आदाब अर्ज" करायला लागलेल्या मुख्यमंत्र्यांना देश आणि महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही,अशी टीका माजी खासदार किरीट सोम्मया यांनी केली आहे.
भाजपा नेत्यांची आघाडी सरकारवर हल्लाबोल -भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकास निधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यादेखील उपस्थित होते. या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यामधून आमदार सदाभाऊ खोत आणि किरीट सोमम्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
पवारांबद्दल,ब्रह्मदेवाला जाऊन विचारणार - शरद पवारांवर टीका करताना आमदार खोत म्हणाले, नुकतंच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी ब्राह्मण समाजाने कधी आरक्षण मागितले नाही,आणि कुणाला आरक्षण देऊ नये,असं म्हंटल होते. पण पवार साहेबांनी ट्विट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका,असे सांगितले. पण ब्राम्हण समाज ओरडून सांगत आहे,आम्ही असं म्हटलं नाही. म्हणून बारामतीचा गडी कसा आला,हे आपण मेल्यावर वर गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे. पवारांच्या मध्ये कोणते स्पेअर पार्ट कुठले घातले होते ? एवढा हुशार माणूस झाला कसा ? मला वाटते की ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला. त्यामुळे इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असा खोचक टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
आम्ही पागल क्रांती करणार -मी आणि गोपीचंद पडळकर पागल माणसं. क्रांती करायला पागल माणसं लागतात. शहाणी माणसे क्रांती करत नाहीत. शहाणी माणसे अभ्यास करतात. शहाणी माणसं तत्वज्ञान शिकवतात. पागल माणसं क्रांती करतात. त्यामुळे आम्ही दोघां पागलांना राज्यात क्रांती करायची आहे,आणि मी पुन्हा येईन हे खरं करायचे आहे.
हर्बल तंबाखु पेरा करण्याची परवानगी द्या -राज्यातील शेतकरयांची अवस्था फार बिकट आहे. अनेक अडचणी शेतकऱ्यांना आहेत,द्राक्ष बागा झोपला आहे. कांदा शेतकऱ्यांची वाट लागली आहे. पण सरकारची मदत मिळत नाही. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना हर्बल तंबाखु पेरा करण्याचा परवानगी द्यावी. विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर आणि आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांना "हर्बल शेती" बियाणं देण्याची मागणी करणार आहे. ज्यामुळे शेतकरयांची गरीबी हटेल.
आम्ही फाटकी माणसं, आमच्या नादाला लागू नका -शेतकरी जागर आक्रोश मोर्चा नंतर विरोधकांच्या बुडाला आग लागली आहे. आपल्या विरोधात 2014 मधील खोटी ऑडीओ क्लिप व्हायरल करण्यात येत आहे. पण आम्ही नागडे-उघडे करून गाडल्या शिवाय आम्ही राहणार नाही. आमच्या नादाला कश्याला लागता, मी आणि पडळकर फाटकी माणसं आहोत. आम्ही गोसावी सारखे,आम्हाला काय फरक पडत नाही. आम्ही आधीचे नंगे आहे, पण तुम्हाला बांबू लावल्या शिवाय राहणार नाही आणि तुम्हाला चौकात नंगे केल्या शिवाय राहणार नाही.
आता"आदाब अर्ज" करायला लागलेत -यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, मोदींच्या नावावर मतं घेऊन त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपले इमान विकले. महाराष्ट्राशी बेईमानी करण्याचे पाप माफिया सेनेच्या नेत्यांनी केले. पण महाराष्ट्राची जनता कधी ही माफ करणार नाही. तसेच विधानसभा निवडणुकीत मते धर्माच्या आणि रामच्या नावाने मिळवली,आता"आदाब अर्ज" करायला लागलेल्या मुख्यमंत्र्यांना देश आणि महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. त्याच बरोबर राज्यात प्रत्येक योजनेत आज घोटाळे सुरू आहेत. पण राज्यातील माफिया आणि लुटारू सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करण्याचा विडा उचललं आहे. तो पूर्ण करून दाखवणार, असा एल्गार ही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.