सांगली- खानापूर विधानसभा मतदारसंघातील ही विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक आहे. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत असाच पाऊस होता. कपबशीच निवडणुकीत चिन्ह होते आणि आताही या दोन्ही गोष्टी आपल्यासोबतच आहेत. 2004 ची पुनरावृत्ती या निवडणूकीत होईल, असा योगायोग आहे. त्यामुळे मतदारसंघातील अपप्रवृत्तींना थांबविण्यासाठी आणि सौहार्दपूर्ण राजकारणाचे वातावरण निर्माण करण्यासाठी या निवडणुकीत जनतेने मला साथ द्यावी, असे भावनिक आवाहन अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केले.
माझ्या मनामध्ये असणार्या सर्व कामांना न्याय मिळावा. यासाठी ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यासाठीच तुम्ही मला साथ द्या, असे आवाहन खानापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केले.