सांगली - दूध दरवाढीच्या मागणीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी थेट गाईच्या गोठ्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. खोत यांनी आपल्या जन्मगावातून (मरळनाथपूर) मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. अशाच पाच लाख पत्रे राज्यातून मुख्यमंत्र्यांना दिली जाणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.
दूध आंदोलन : सदाभाऊ खोतांनी गोठ्यातून लिहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - सांगली दूध आंदोलन
दूध दरवाढीच्या मागणीसाठी दूध आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला. दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गाईच्या गोठ्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी दूध आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला. दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गाईच्या गोठ्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. आजपासून १८ ऑगस्टपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून या दरम्यान ५ लाख पत्रे मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत.
या पत्रांतून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे किंवा राज्य सरकारने गायीचे दूध प्रति लिटर ३० रुपये प्रमाणे खरेदी करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. जर सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.