सांगली - दिल्लीच्या हिंसाचार प्रकरणी कृषी कायद्याला विरोध करणार्यांना पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात या मागणीसाठी इस्लामपूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
दिल्लीत हिंसा करणाऱ्यांना बेड्या ठोका, सदाभाऊ खोत-गोपीचंद पडळकरांची मागणी - rayat kranti sanghatana
रयत क्रांती संघटना आणि भाजपच्या वतीने सांगलीतील इस्लामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
![दिल्लीत हिंसा करणाऱ्यांना बेड्या ठोका, सदाभाऊ खोत-गोपीचंद पडळकरांची मागणी दिल्लीत हिंसा करणाऱ्यांना बेड्या ठोका, सदाभाऊ खोत-गोपीचंद पडळकरांची मागणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10399676-614-10399676-1611746446746.jpg)
कृषी कायदे मागे न घेण्याची मागणी
केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये कृषी कायदे मागे घेऊ नये अशी मागणी रयत क्रांती संघटना आणि भाजपकडून यावेळी करण्यात आली आहे. दिल्लीत कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा निषेध नोंदवित काढलेल्या मोर्चात रयत क्रांती संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. या मोर्चाद्वारे प्रांताधिकार्यांना निवेदन देत, दिल्लीत हिंसाचार करणाऱ्यांना बेड्या ठोकण्याीच मागणी करण्यात आली.
हेही वाचा -भाजपला शिवसेनेचा 'दे धक्का'.. समीर देसाई यांचा सेनेत प्रवेश