सांगली -मुंबई-पुण्याच्या लोकांना जिल्हा बंदी करणारे सतेज पाटील जिल्ह्याचे मंत्री आहेत, की राज्याचे? हेच कळत नाही, असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. तसेच महापुरात मदत करणाऱ्या या मुंबई-पुण्याहून येणाऱ्या लोकांसाठी प्रसंगी छावण्या उभाराव्यात, अशी मागणीही खोत यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
'मुंबई-पुण्याच्या लोकांना बंदी करणारे सतेज पाटील जिल्ह्याचे मंत्री की राज्याचे?' - स्थलांतरीतांबद्दल सतेज पाटील
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात मुंबई-पुणे या ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्याहून येणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध घालण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य केले होते. त्यावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सतेज पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात मुंबई-पुणे या ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्याहून येणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध घालण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य केले होते. त्यावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सतेज पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. महापुराच्या काळात मुंबई-पुण्याच्या लोकांनी सांगली- कोल्हापूरला मदत केली आहे. आपले बांधव असणाऱ्या त्या लोकांच्या बाबतीत कोरोनाच्या काळात माणुसकी दाखवली पाहिजे. तसेच त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी वेळ प्रसंगी ग्रामसभेत ठराव करून जनावरांच्या छावण्याप्रमाणे माणसाच्याही छावण्या उभा कराव्यात लागतील, असे मतही खोत यांनी व्यक्त केले.
निवडणुकीच्या काळात गाड्या पाठवून बोलवून घेतात. मात्र, आता बंदी घालत आहेत, असा टोला खोत यांनी लगावला आहे. त्याचबरोबर आत्ताचे सरकार कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यात अपयशी ठरलेले आहे, असा आरोपही खोत यांनी केला.