सांगली- विरोधी पक्षांच्या दुकानांना कुलूप लागले आहे. त्यामुळे हाताला काम नसल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्हीएम मशीन बाबत गैरसमज पसरवण्याचा उद्योग विरोधकांनी सुरू केला आहे, अशी घणाघाती टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. विरोधी पक्षांच्या ईव्हीएम बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते सांगली येथे बोलत होते.
विरोधी पक्षांच्या दुकानांना कुलूप लागल्यानेच ईव्हीएमला विरोध- सदाभाऊ खोत
देशासह राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या मुद्यावर एकत्र येऊन विरोध सुरू केला आहे. यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला.
देशासह राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या मुद्यावर एकत्र येऊन विरोध सुरू केला आहे. यावर सदाभाऊ खोत यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.
आज अनेक प्रगत देशात ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेतल्या जात आहेत. काँग्रेस सरकारच्या सत्ता काळापासूनच ईव्हीएम मशीन वापरण्यास सुरुवात झाली. जर ईव्हीएम यंत्रणा अयोग्य होती तर काँग्रेस सरकारच्या काळात का वापरली गेली, याचं उत्तर जनतेला द्याव, असा सवाल खोत यांनी केला आहे. विरोधकांकडे आता राज्यातील प्रश्नच शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे जनतेच्या समोर कसे जायचे म्हणून सर्व विरोधक एकत्र येत विरोध करत आहेत. राज्यातील विरोधी पक्षांच्या दुकानांना कुलूप लागले असून, विरोधकांची दुकानदारी बंद पडली आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ईव्हीएमवरून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.