सांगली - टँकर आणि चारा छावणीची मागणी आल्यास २४ तासात मागणी पूर्ण करा, अशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगली प्रशासनाला दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
टँकर आणि चारा छावणीची मागणी २४ तासात पूर्ण करा - सदाभाऊ खोत - सांगली
ज्या गावातून टँकरची मागणी येईल, ज्या विभागातून चारा छावण्यांचा प्रस्ताव यईल, त्याठिकाणी २४ तासात प्रस्ताव मंजूर करा.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावाच्या पाण्याची परिस्थिती, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा, टँकरची सोय यांचा आढावा घ्यावा. तसेच ज्या गावातून टँकरची मागणी येईल, त्याठिकाणी २४ तासात टँकर उपलब्ध करुन द्यावे. त्याचबरोबर ज्या विभागातून चारा छावण्यांचा प्रस्ताव यईल, त्याठिकाणी २४ तासात प्रस्ताव मंजूर करा. ज्या गावात पाण्याचे टँकर सुरू आहेत तेथे गरज पडल्यास टँकरची संख्या वाढवा, अशा सूचना यावेळी जिल्हा प्रशासनाला मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.