सांगली - वाळवा तालुक्यातील कणेगाव फाट्यावरुन एक पांढऱ्या रंगाच्या इर्टिका गाडीतून अवैध्यरित्या गुटक्याची वाहतूक होणार असल्याची गोपिनीय माहिती माहिती मिळाली. त्यानुसार आज शनिवार दि 24 ला सकाळी सात वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे व पो. नाईक अनिल पाटील यानी राष्ट्रीय महामार्गावरील कणेगाव फाट्यावर सापळा लावला होता. यावेळी गाडी (क्र. Mh16AT2531) ही कणेगाव फाट्यावर येताच गाडीला थांबवून तपासणी केली असता सहा लाख एकसष्ट हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कर्नाटकच्या गुटका व्यापाऱ्याला सांगलीत अटक, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त - सांगली कर्नाटक गुटका व्यापारी अटक बातमी
या तपासणीवेळी पोलिसांना १ लाख १२ हजार रुपयांचा गुटका, २० हजार रुपयांचा गुटखा मसाला, १९ हजार ८०० रुपयांची सुगंधी तंबाखू तर ६ हजार रुपयांच्या पॅकिंगमध्ये इतर गुटका सदृश्य वस्तू सापडून आलेल्या आहेत. असा एकूण १ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. तर अधिक माहिती घेतली असता चालक मोहन सुखदेव रासकर (वय 23, रा. अहमदनगर) हा फिरता व्यापारी असून तो कर्नाटकातील निपाणी वरून Vspm व vs या कंपनीचा पान मसाला जाणता राजा पान शॉपचे मालक किरण पांडुरंग कोकाटे (श्रीगोंदा चौक, मु पो कष्टिता ता. श्रीगोंदा जी. अहमदनगर) यांच्यासाठी घेऊन जात असल्याचे कबूल केले.
या तपासणीवेळी पोलिसांना १ लाख १२ हजार रुपयांचा गुटका, २० हजार रुपयांचा गुटखा मसाला, १९ हजार ८०० रुपयांची सुगंधी तंबाखू तर ६ हजार रुपयांच्या पॅकिंगमध्ये इतर गुटका सदृश्य वस्तू सापडून आलेल्या आहेत. असा एकूण १ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. तर अधिक माहिती घेतली असता चालक मोहन सुखदेव रासकर (वय 23, रा. अहमदनगर) हा फिरता व्यापारी असून तो कर्नाटकातील निपाणी वरून Vspm व vs या कंपनीचा पान मसाला जाणता राजा पान शॉपचे मालक किरण पांडुरंग कोकाटे (श्रीगोंदा चौक, मु पो कष्टिता ता. श्रीगोंदा जी. अहमदनगर) यांच्यासाठी घेऊन जात असल्याचे कबूल केले. 5लाख रुपयाची इर्टिका गाडी व पान मसाला असा एकूण सहा लाख एकसष्ट हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक मोहन रासकर व किरण कोकाटे सह vspm व vs या कंपनीवर कुरळप पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तक्रारदार म्हणून दत्तात्रय हनुमंत कोळी (अन्नसुरक्षा अधिकारी, सांगली) यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे करत आहेत.