सांगली - सांगली जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागले ( Sangli Local Body Election 2022 ) आहेत. कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीने तर कडेगावमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. खानापूर नगरपंचायतमध्ये काँग्रेस- शिवसेना आघाडीने सत्ता कायम ठेवली आहे. तर महापालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे.
रोहित पाटलांनी मारली बाजी, विश्वजित कदमांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग, पहा सविस्तर निकाल धक्कादायक निकाल..
सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले होतं. तीन नगरपंचायतीच्या 52 जागांसाठी 165 उमेदवार रिंगणात होते. तिन्ही नगरपंचायतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने लढती पार पडल्या होत्या. या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागले आहेत.
कवठेमहांकाळ मध्ये राष्ट्रवादीची बाजी..
कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष आघाडी अशी लढत झाली. त्यामध्ये रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजपा, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा गट असा सामना झाला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी दहा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी शेतकरी विकास आधारित पॅनलला पाच जागा तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे.
मंत्री विश्वजित कदमांना धक्का..
कडेगाव नगरपंचायतीचा निकाल धक्कादायक लागला आहे. काँग्रेसचे नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या सत्तेला भाजपाने सुरुंग लावला आहे. 17 पैकी 11 जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. काँग्रेसला 5 जागा याठिकाणी मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे.
राष्ट्रवादी आघाडीची सरशी..
खानापूर नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेस -शिवसेना आघाडीने सत्ता मिळवली आहे. 17 जागांपैकी काँग्रेस- शिवसेना आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी व जनता आघाडीला 8 जागा तर अपक्षाला 1 जागा मिळाली आहे. मात्र, भाजपाला या ठिकाणी एकही जागा मिळाली नाही. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी भाजपने निवडणूक लढवली होती.
काँग्रेस उमेदवाराचा विजय..
तर दुसऱ्या बाजूला सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. याठिकाणी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना आणि अपक्ष अशी लढत झाली. ज्यामध्ये काँग्रेसचे नेते व स्वर्गीय माजी महापौर हारून शिकलगार यांचे सुपुत्र तोफिक शिकलगार यांचा विजय झाला आहे.
एक नजर जिल्ह्यातील निकालावर..
कडेगाव नगरपंचायत- 17 ( Kadegaon Nagarpanchayat Election Result 2022 )
विश्वजित कदम यांना धक्का.. काँग्रेसचा पराभव
काँग्रेस - 5
राष्ट्रवादी काँग्रेस - 1
भाजपा -11
अपक्ष -
कवठेमहांकाळ नगरपंचायत - 17 जागा ( Kavathe Mahankal Nagarpanchayat Election Result 2022 )
राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय, रोहित पाटलांनी मारली बाजी..
शेतकरी विकास आघाडी - 6
राष्ट्रवादी काँग्रेस - 10
भाजपा -आरपीआय -
अपक्ष - 1
खानापूर नगरपंचायत- 17 जागा( Khanapur Nagarpanchayat Election Result 2022 )
राष्ट्रवादी जनता आघाडी - 7
काँग्रेस-शिवसेना आघाडी - 9
भाजपा - 0
अपक्ष 1
सांगली महापालिका प्रभाग 16 पोटनिवडणुक ( Sangli Municipal Corporation Re-Election Result 2022 )
काँग्रेस विजयी..
काँग्रेस - 1
भाजपा -
शिवसेना
काँग्रेस विजयी..