महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rohit Patil : छळ, कपट व अहंकार तुमच्या तोंडात शोभत नाही; रोहित पाटलांची संजयकाकांवर जोरदार टीका - कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुक

Rohit Patil criticized: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित आर आर पाटील NCP youth leader Rohit RR Patil यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीतील Kavthemahankal Nagar Panchayat Mayor Election पराभवानंतर खासदार संजयकाका पाटलांवर निशाणा साधला आहे.

Rohit Patil criticized
Rohit Patil criticized

By

Published : Oct 22, 2022, 8:16 PM IST

सांगली:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित आर आर पाटील NCP youth leader Rohit RR Patil यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीतील Kavthemahankal Nagar Panchayat Mayor Election पराभवानंतर खासदार संजयकाका पाटलांवर निशाणा साधला आहे. आपल्यावर छळ, कपट व अहंकाराचा आरोप करणारया संजयकाका पाटील यांच्या तोंडात हे शब्द शोभत नाही. सर्व जिल्ह्याला ते चांगले माहित आहेत. अश्या शब्दात रोहित पाटलांनी भाजपा खासदार संजय काका पाटलांवर पलटवार केला आहे.

रोहित पाटलांची जोरदार टीका

नगराध्यक्ष निवडणुकीत बाजी:कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते रोहित आर आर पाटील यांनी 10 महिन्यांपूर्वी सर्व विरोधकांना चारीमुंड्या चित करत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली होती. मात्र आता त्याच नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजपाचे खासदार संजयकाका पाटलांनी रोहित पाटील यांना धक्का देत, राष्ट्रवादी काँग्रेसची चार मते फोडून नगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आहे. या विजयानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटलांच्यावर टीका करताना रोहित पाटलांना सत्तेचा गर्व झाला होता. आणि छळ, कपट अहंकारातून त्यांनी सत्ता मिळवल्याचा आरोप केला होता.

आबाच्या विचारांचा विजय:दरम्यान कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीतील पराभव आणि खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या युवा नेते रोहित आर.आर पाटील यांनी खासदार संजयकाका पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आबांच्या विचारांचा विजय केला होता. काही लोकांनी मतदारांच्या विचारांशी प्रतारणा केली, काहींवर प्रचंड दबाव होता, तर काही जण पैशाच्या आमिषाला बळी पडले, त्यातून हा सर्व प्रकार घडला आहे.

संजयकाका पाटलांना टोला : तसेच संजयकाका पाटील यांनी आपला बाबतीत जे शब्द वापरले आहेत, छळ, कपाट आणि अहंकार खरं, तर त्यांच्या तोंडातून हे शब्द शोभत नाहीत. जिल्ह्याला त्यांच्याबद्दल सर्व माहिती आहे. वेळोवेळी तालुक्यातील जनतेने मतपेटीतून ते दाखवून दिलं आहे. आर. आर.आबांना देखील संघर्ष करावा लागला होता. 7 वेळा आबा विजयी झाले होते. त्यानंतर सुमनताई 2 वेळेस विजय झाले आहेत. मात्र आम्हाला विजयाचा व सत्तेचा गर्व कधीच झाला नाही. तसेच पराभव व विजयाच्या गर्तेत आम्ही कधीच अडकलो नाही. तसेच पैसे आणि दहशतीच्या जोरावर चार मत फोडण्यात आली. आणि चिट्ठीवरचा आलेलं सरकार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे पराभव माझा का विरोधकांचा ? असा टोला देखील रोहित पाटलांनी खासदार संजयकाका पाटलांना लगावला आहे.

आर.आर.आबांना राजकारणात सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. 2 वेळा त्यांना मारहाण देखील झाली. आबांच्या पश्चात आमच्या कुटुंबावर मार्केट कमिटीच्या निवडणुकीनिमित्त हल्ला देखील झाला, पण आमच्यावर हल्ले झाले म्हणून आम्ही घाबरलो नाही, असेही रोहित पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details