महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अबब ! एकाच रात्री चोरट्यांनी फोडली तब्बल 10 दुकाने, लाखोंचा माल लंपास - robbery in night at 10 shops

सांगली नजीकच्या कुपवाड शहरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल दहा ठिकाणी चोरी केल्या आहेत. शहरातील कापड दुकान, किराणा दुकान अशा छोट्या-मोठ्या दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. शटर उचकटून या चोऱ्या करून दुकानातील साहित्यासह रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. आज (शनिवारी) सकाळी या चोरीच्या घटना उघडकीस आल्याने शहरात एकाच खळबळ उडाली.

एकाच रात्री चोरट्यांनी फोडली तब्बल 10 दुकाने

By

Published : Oct 5, 2019, 3:11 PM IST

सांगली - जिल्ह्यातील कुपवाड शहरात एकाच रात्री तब्बल 10 दुकाने फोडत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. तर कडेकोट आचारसंहिता सुरू असताना देखील चोरीच्या घटनेमुळे कुपवाड शहरात एकच खळबळ माजली आहे.

हेही वाचा -सगळा अट्टहास 'आरे'मध्येच का? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

सांगली नजीकच्या कुपवाड शहरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल दहा ठिकाणी चोरी केल्या आहेत. शहरातील कापड दुकान, किराणा दुकान अशा छोट्या-मोठ्या दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. शटर उचकटून या चोऱ्या करून दुकानातील साहित्यासह रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. आज (शनिवारी) सकाळी या चोरीच्या घटना उघडकीस आल्याने शहरात एकाच खळबळ उडाली.

हेही वाचा -सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या जवान चंदू चव्हाण यांचा आर्मीचा राजीनामा

घटनेची माहिती मिळताच, कुपवाड पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. तर विधानसभेच्या निवडणूकीसाठी आचारसंहितेचे कडेकोट पालन सुरू असताना शहरात या चोरीच्या घटनेमुळे पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्न निर्माण करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details