महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सराफा दुकानावर चोरट्यांचा डल्ला, 10 लाखांचा मुद्देमाल लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

माधवनगर येथील मुख्य बाजारपेठेतील राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानात चोरीचा प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानातील तिजोरीत असणारे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे.

sangli
सराफा दुकानावर चोरट्यांचा डल्ला

By

Published : Dec 26, 2019, 7:50 AM IST

सांगली - माधवनगर येथील एका सराफा दुकानात चोरीचा प्रकार घडला आहे. १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह १० लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. दुकानाची कौल काढून आतमध्ये प्रवेश करत चोरट्यांनी ही चोरी केली आहे. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सराफा दुकानावर चोरट्यांचा डल्ला

माधवनगर येथील मुख्य बाजारपेठेतील राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानात चोरीचा प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानातील तिजोरीत असणारे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. बुधवारी सकाळी दुकानाचे मालक दत्तात्रय कदम यांचा मुलगा दुकान उघडण्यासाठी गेला असता, हा चोरीचा प्रकार समोर आला. चोरट्यांनी दुकानावर चढत, दुकानाची कौले काढून आत प्रवेश केला. तिजोरी फोडून त्यातील ७ किलो चांदी, १५ तोळे सोन्याचे दागिने आणि १ ते दीड लाख रुपये रोकड असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल चोरी केला आहे. या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तर, या घटनेमुळे माधवनगरमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरी प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details