महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजब! मुसळधार पावसात रस्त्याचे डांबरीकरण, आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक

भर पावसात रस्त्याचा डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार इस्लामपूरमध्ये घडला ( Road asphalting in heavy in Islampur ) आहे. मुसळधार पाऊस पडत असताना ठेकेदाराकडून रस्त्याचे डांबरीकरण आणि साईड पट्ट्या भरण्याचे काम ( Filling Road side damage ) उरकण्यात आले आहे. हे सर्व प्रकारात बाबतीत आरपीआयने पुन्हा रस्ता न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Road asphalting in rain
मुसळधार पावसात रस्त्याचे डांबरीकरण

By

Published : Oct 7, 2022, 4:02 PM IST

सांगली -भर पावसात रस्त्याचा डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार इस्लामपूरमध्ये घडला ( Road asphalting in heavy in Islampur ) आहे. मुसळधार पाऊस पडत असताना ठेकेदाराकडून रस्त्याचे डांबरीकरण आणि साईड पट्ट्या भरण्याचे काम ( Filling Road side damage ) उरकण्यात आले आहे. हे सर्व प्रकारात बाबतीत आरपीआयने पुन्हा रस्ता न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुसळधार पावसात रस्त्याचे डांबरीकरण

रस्त्याची मोठी दुरावस्था - इस्लामपूर-ताकारी मार्गावरील राजाराम नगर रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. अनेक वर्षे हा वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्याच्या मोठी दुरावस्था झाले आहे. तर ताकारीकडे जाणारी वाहतूक मोठी आहे. याच रस्त्यावरून ऊसाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे रस्ता रूंदीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी रस्त्याच्या साईटपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. रुंदीकरण करताना यांत्रिकीकरणाच्या साह्याने डांबरीकरण सुरु होते. दरम्यान गुरुवारी सायंकाळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला,आणि धुंवाधार पाऊस पडत असताना रस्ता रुंदीकरणाचे काम थांबवणे आवश्यक होते. मात्र ठेकेदाराकडून कामगारांना काम सुरूच ठेवा अशा सूचना आल्याने काम सुरू होते. डांबर मिश्रित खडी डंपरने आणून मशिनच्या साह्याने कामगारांनी डांबरीकरण केले. साईडपट्टी भरण्याचा कार्यभार मुसळधार पाऊसात उरकण्यात आला. भर पावसात करण्यात आलेल्या या कामामुळे अनेकांना आश्चर्य तर वाटलेच, शिवाय पावसात करण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप ही व्यक्त करण्यात येत होता.

मुसळधार पावसात डांबरीकरणाचे काम - दरम्यान मुसळधार पावसात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम झाले आहे.त्यामुळे या निकृष्ठ कामाचा पंचनामा करुन काम पुन्हा करायला भाग पाडू.संबधीत ठेकेदारावर बांधकाम विभागाने कारवाई करावी,अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे यांनी दिला ( RPI Warning of agitation ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details