सांगली- लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसह रिक्षाचालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत अडकलेल्या रिक्षाचालकांना राजेश नाईक फाऊंडेशन आणि सजावटकर्टन हाऊस यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांनी सांगली शहरातील रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. यात रिक्षा व्यवसायाचाही समावेश आहे. रिक्षाचालकांची झालेली अवस्था ओळखून, राजेश नाईक फाऊंडेशन आणि सजावट कर्टन हाऊस यांनी संयुक्तरीत्या रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
शहरातील काँग्रेस कमिटीसमोरील मधुबन रिक्षा स्टॉपवरील रिक्षाचालकांना फाऊंडेशनचे संस्थापक व माजी नगरसेवक राजेश नाईक व चेतन सारडा यांच्या हस्ते हे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप आपटे, जेष्ठ नागरीक दत्तात्रय मुळीक, नंदकुमार करांडे, अशोक मुळीक, दत्तात्रय शिंदे, उदय शिंदे, नितीन गायकवाड, विश्वास केसरे, धनंजय भोर, दीपक ताटे, नितीन गायकवाड, राहुल मुळीक, सतीश कलगुटगी आदी उपस्थित होते.