सांगली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लबच्यावतीने सांगलीत राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ३ राज्यातील सुमारे २०० नेमबाजांनी सहभाग घेतला होता.
सांगलीत रायफल शूटींगचा थरार; ३ राज्यातील २०० स्पर्धकांचा सहभाग - मुख्यमंत्री
स्पर्धेत ३ राज्यातील सुमारे २०० नेमबाजांनी सहभाग घेतला होता.
सांगलीत रायफल शूटींगचा थरार
शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या परिसरात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील २०० नेमबाज स्पर्धकांनी सहभाग दर्शवला होता. शॉटगन, एअर रायफल, एयर पिस्टल, १२ बोअर गन, एनपी बोअर, रिव्हॉल्व्हर पिस्टल या प्रकारात नेमबाजांनी आपले नेमबाजीचे प्रदर्शन केले. नेमबाजीचा थरार पाहण्यासाठी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती.