सांगली- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीबाबत महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलणे टाळले आहे. ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी मौन पाळणे पसंत केले आहे.
राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर चंद्रकांत पाटलांचे फक्त 'स्मितहास्य' - Sangli
मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीवरून भाजप सरकारवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीबाबत विचारले असता पाटील यांनी स्मित हास्य करत यावर बोलणे टाळले आहे.
![राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर चंद्रकांत पाटलांचे फक्त 'स्मितहास्य'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4213553-thumbnail-3x2-yu.jpg)
महसूल मंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
महसूल मंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीवरून भाजप सरकारवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान आज राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगली दौऱ्यावर आले होते. त्यांना राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीबाबत विचारले असता, पाटील यांनी स्मित हास्य करत यावर बोलणे टाळले.
Last Updated : Aug 22, 2019, 11:44 PM IST