महाराष्ट्र

maharashtra

जत महसूल विभागाची वाळू तस्करीविरोधात छापेमारी सुरूच; दोन ट्रॅक्टरसह जेसीबी ताब्यात

By

Published : Nov 22, 2020, 4:35 AM IST

Updated : Nov 22, 2020, 5:42 AM IST

जतच्या पूर्व भागात महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर नदीपात्रात वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तालुक्यातील करजगी, भिवर्गी येथे महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून दोन ट्रॅक्टरसह एक जेसीबी ताब्यात घेतला आहे.

revenue-department-raids-against-sand-smuggling-in-sangli
जत महसूल विभागाची वाळू तस्करीविरोधात छापेमारी सुरूच; दोन ट्रॅक्टरसह जेसीबी ताब्यात

सांगली - जत तालुक्यातील भिवर्गी येथे महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी धाडी टाकून बोर नदीत वाळू तस्कारी करणारे दोन ट्रॅक्टर तसेच एक जेसीबी ताब्यात घेतला आहे. या वर्षातील सर्वातील ही मोठी कारवाई आहे. भिवर्गी येथे संख मध्यम प्रकल्पाजवळ वाळूने भरलेला कर्नाटक पासिंगचा ट्रॅक्टर क्रमांक केए २३ टीबी ४८१८ व एमएच १३ एएच ०३८३ क्रमाकांचा जेसीबी आढळून आला. महसूल विभागाच्या पथकाने ट्रँक्टर, वाळू जप्त करुन अप्पर तहसिलदार कार्यालयात लावला आहे. तसेच या ट्रँक्टर व जेसीबी मालकांना नोटीस देण्यात आली आले.

महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर नदीपात्रात वाळू तस्करी-


पूर्व भागात बोर नदी 64 किमी अंतर आहे. तत्कालीन अप्पर तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी धडक मोहीम राबवून तस्करीला मोठा चाफ लावला होता. तसेच तस्करांना मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला होता. त्यांची आँक्टोबर महिन्यात त्यांंची बदली झाली आहे. त्यांनी बदली झाल्यावर महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर नदीपात्रात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या दिवाळी सुट्टीचा फायदा घेऊन तस्करांना मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु केला आहे.

हेही वाचा- ..असे वक्तव्य समाजामध्ये विघटन घडवणारे, कोणत्याही धर्माला कमी लेखणं चुकीचं, प्रकाश आंबेडकरांचा ओवैसींना टोला

Last Updated : Nov 22, 2020, 5:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details