महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 22, 2020, 4:11 PM IST

ETV Bharat / state

सांगलीत उद्यापासून शाळा पुन्हा सुरू करण्याची तयारी पूर्ण; सहा हजार शिक्षकांच्या कोरोना चाचण्या, 22 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

सोमवारपासून (२३ नोव्हेंबर) शाळेची घंटा वाजणार, असे शासनाकडून निश्चित केले गेले. त्यासाठी शाळांना सर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आलेत. शिक्षण विभागाच्या आदेशाने शाळा देखील तयारीला लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सांगलीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत.

resume-school-from-tomorrow
सांगलीत उद्यापासून शाळा पुन्हा सुरू

सांगली - सांगली जिल्ह्यामध्ये सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. ज्यामध्ये 6 हजाराहून अधिक शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये पालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील 22 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

5 हजार शिक्षकांच्या कोरोना चाचण्या -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोमवारपासून नववी ते बारावी या वर्गातल्या शाळा सुरू होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील सुमारे 750 इतक्या शाळा या सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे. जवळपास दीड लाख विद्यार्थी आहेत. तर 8 हजार 456 इतके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या शाळांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील जवळपास 6 हजाराहून अधिक शिक्षकांच्या कोरोना टेस्ट झाली असून उर्वरित शिक्षकांच्याही टेस्ट लवकरच पूर्ण होतील, असे,प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

22 शिक्षकांना कोरोनाची लागण -

सांगली महापालिका क्षेत्रातील 110 शाळा आहेत आणि शाळा सूर करण्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि येथील शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. तसेच शाळा या निर्जंतुक करण्याबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू आहे. खबरदारी म्हणून मनपा क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून 1 हजार 823 जणांची कोरोना चाचणी केली जात आहे आणि यापैकी 7 शिक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यतील आणखी 15 शिक्षकांनाही कोरोना लागण झाल्याचे टेस्टमध्ये समोर आले आहे.

50 हजार विद्यार्थ्यांचे संमती पत्र -

राज्य शासनाने विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशाबाबत प्रशासनाने पालकांच्या संमती पत्र मागवलेले आहेत, त्यानुसार सांगली जिल्ह्यातील एक लाख 75 विद्यार्थ्यांपैकी 50 हजार विद्यार्थ्यांचे संमती पत्र त्यांच्या पालकांकडून जमा करण्यात आलेले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details