सांगली- पाण्याच्या शोधात 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या एका कोल्ह्याच्या पिल्ल्याची सुटका करण्यात आली. सांगली जिल्हा वन विभाग, अॅनिमल राहत व प्राणी मित्रांच्या 4 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या कोल्ह्याला जीवदान मिळाले आहे.
पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याच्या पिल्ल्याची सुखरूप सुटका - आगळगाव
सांगलीच्या आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील एका 60 फुट खोल विहिरीत कोल्ह्याचे पिल्लू पडले होते. 4 तासांच्या प्रयत्नानंतर त्याला जीवदान मिळाले.
![पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याच्या पिल्ल्याची सुखरूप सुटका कोल्ह्याच्या पिलाला रेस्क्यू करताना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6217487-thumbnail-3x2-sng.jpg)
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील गणेश घाटके यांच्या शेतात असणाऱ्या 60 फूट खोल विहिरीत एक कोल्ह्याचे पिल्लू पाण्याच्या शोधात जाऊन पडले होते. याची माहिती मिळताच घाटके यांनी वनविभाग आणि प्राणी मित्र विजय पाटील यांना कळवले, तसेच गावातील सर्प मित्र विजय पाटील, एकनाथ मोरे यांनाही याची माहिती दिली. गणेश घाटके घटनास्थळी जाऊन कोल्ह्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण, त्यांच्याकडे कोणतेही साधने नसल्याने त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी वनविभाग आणि अॅनिमल राहतच्या पथकाला याची माहिती दिली. काही वेळातच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली. कोल्ह्याच्या पिलाला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. आधुनिक सुरक्षा साधनांचा वापर करून 60 फूट खोल विहिरीत उतरत विहीरीत बसलेल्या कोल्ह्याच्या पिलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.
हेही वाचा -इस्लामपुरात पोलिसांनी ठोकल्या चोरास बेड्या, प्रेयसीसाठी करत होता घरफोडी