महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BREAKING: सांगलीतील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीत बोट उलटली; ९ जणांचा मृत्यू तर १५ जणांना वाचवण्यात यश - Sangli Flood

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेली खासगी बोट कृष्णा नदीत उलटली असून यात ९ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या बोटीत एकूण ३० जण होते अशी माहिती मिळत आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेली बोट कृष्णा नदीत उलटली; 15 जण बुडाले

By

Published : Aug 8, 2019, 12:54 PM IST

Updated : Aug 8, 2019, 3:48 PM IST

सांगली - ब्रह्मनाळ (तालुका पलूस जि. सांगली) येथे ग्रामपंचायतची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. आणखी ३ जणांना बुडाल्याची शक्यता असून ३ जण बेपत्ता आहेत. बोटमध्ये एकूण ३० लोक होते, अशी माहिती जिल्हा प्रशासनकडून देण्यात आली. मृतांमध्ये ७ महिला, १ पुरुष आणि २ महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. दरम्यान, शोधकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

सांगलीतील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीत बोट उलटली

ब्रम्हनाळ येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेली खासगी बोट कृष्णा नदीत उलटली होती. पलूस तालुक्यातील कृष्णा नदीमध्ये ब्रम्हनाळमधून नजीक असणार्‍या खटावकडे जात असताना नदीपात्रात ही बोट उलटली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


बोट दुर्घटनेतील मृतांची नावे -

  • १) बाबासो अण्णासो पाटील
  • २) कल्पना रवींद्र कारंडे
  • ३) कस्तुरी बाळासो वडेर
  • ४) पप्पूताई भाऊसो पाटील
  • ५) लक्ष्मी जयपाल वडेर
  • ६) राजमाती जयपाल चौगुले
  • ७) मृत एक लहान मुल
  • ८) अनोळखी इसम

न सापडलेली व्यक्ती

  • १) पिल्लू तानाजी गडदे

सांगलीला महापुराचा फटका

सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी आज सकाळी तब्बल ५६.१० फुटांवर पोहोचली होती. पाणी पातळी वाढल्याने शहराला पुराच्या पाण्याचा विळखा वाढत चालला होता. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ, भारतीय लष्कर आणि नौदलाकडून बचावकार्य राबवण्यात येत आहे. सांगली शहरासह नदीकाठच्या गावात अद्यापही हजारो नागरिक अडकले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी बचाव दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. सांगलीच्या महापुराने रौद्ररुप धारण केले असल्याने बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. जिल्हा प्रशासनाची आपत्ती यंत्रणा कोलमडून पडली आहे. प्रशासनाच्या संपर्क यंत्रणेसह बोटीसुद्धा बंद पडल्या आहेत.

सांगलीत पुनर्वसन करण्यात आलेली आकडेवारी :

मिरज - 19 गावांतील 3,639 कुटुंबांतील 19,697 लोक व 5,580 जनावरे.

पलूस - 22 गावांतील 4,114 कुटुंबांतील 19,204 लोक व 5,510 जनावरे.
वाळवा - 30 गावांतील 4,307 कुटुंबांतील 19,532 लोक व 7,279 जनावरे.
शिराळा - 17 गावांतील 292 कुटुंबांतील 1,318 लोक व 2,298 जनावरे.

तर, सांगली महानगरपालिका क्षेत्रातील 907 कुटुंबांतील 9,963 लोक व 443 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

संपर्क तुटलेली गावं..
मिरज - बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज.
वाळवा - शिरगाव, भरतवाडी.
पलूस - भिलवडी, तावदरवाडी, सुखवाडी, राडेवाडी, सूर्यगाव, तुपारी, बुर्ली, नागराळे, दह्यारी, घोगाव, पुणदी.

या वरील गावांचा संपर्क तुटल्यामुळे याठिकाणी हजारो नागरिक अद्याप अडकून पडले आहेत.

हेही वाचा- सांगलीत महापुराची स्थिती बनली भयंकर; प्रशासनाची यंत्रणा कोलमडली, हजारो नागरिक अडकले पुराच्या पाण्यात

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ही गंभीर पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. पुरस्थितीचा सामना करण्यासाठी या जिल्ह्यात तीन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) दाखल झाली असून प्रादेशिक दलाचे 211 जवान मदतीसाठी आले आहेत. यासोबतच कोल्हापूर, पुणे-चिंचवड महानगरपालिका यांनी पाठविलेल्या पथकांकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

हेही वाचा- सांगली जलमय : महापुराच्या विळख्यात अजूनही हजारो नागरिक, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Last Updated : Aug 8, 2019, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details