सांगली- जिल्ह्यातील महापुरात प्राथमिक पंचनाम्यानुसार तब्बल ७५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकाला या प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.
महापुरात 750 कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल केंद्रीय पथकासमोर सादर
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुरात सांगली शहरासह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यातील १०४ गावांची प्रचंड मोठी हानी झाली आहे. महापुरात प्राथमिक पंचनाम्यानुसार तब्बल ७५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकाला या प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुरात सांगली शहरासह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यातील १०४ गावांची प्रचंड मोठी हानी झाली आहे. घर, शेती, जनावरे, व्यापार अशा सर्व पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत. तर महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानेही सांगली शहरासह चार तालुक्यातील गावांची पाहणी केली आहे.
तर या पथकाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. ७५० कोटी रुपयांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा हा अहवाल केंद्रीय पथकाला सादर केल्याची माहिती, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. मात्र, नुकसानीचा आकडा हा अंतरिम नसून अजून पंचनामे सुरू असल्याने ते आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.