सांगली - केंद्रीय आयकर आणि जीएसटी जाचक कायद्याच्या विरोधात विविध मागण्यांचे निवेदन सांगलीमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जाचक अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. टॅक्सेशन कन्सल्टंट असोसिएशनच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.
जीएसटी कार्यालयांना कायदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन-
केंद्रीय आयकर आणि वस्तू व सेवा कर कायद्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटण्ट, उद्योजक, व्यापारी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कायद्यात असणाऱ्या जाचक अटीमुळे आर्थिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले आहे. तसेच देशभर जीएसटी कार्यालयांना कायदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात येत आहे.