महाराष्ट्र

maharashtra

सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश; निर्बंधात शिथिलता

By

Published : Jun 15, 2021, 9:58 AM IST

Updated : Jun 15, 2021, 12:35 PM IST

सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यानंतर दीड महिन्यानंतर कडक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली.

सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश
सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश

सांगली- जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्हिटी दर कमी होत असल्याने सर्वच आस्थापना खुली करण्यात आली आहेत. सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत दुकानांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीतील सर्व व्यापार सुरू झाले आहेत. पहिल्याच दिवशी खरेदीसाठी सांगलीकरांची तुरळक गर्दी रस्त्यावर दिसून आली.

सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश
जिल्हाचा तिसऱ्या टप्प्यात समावेशसांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यानंतर दीड महिन्यानंतर कडक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने-व्यापार बंद होती. राज्य शासनाच्या नियमावलीनुसार पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या टक्केवारीनुसार जिल्ह्यात शिथीलता देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांहून खाली आल्याने चौथ्या टप्प्यात असणाऱ्या जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा बरोबर इतर आस्थापनांना जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी विक्रीसाठी परवानगी दिली आहे. कोरोना नियमांचे पालन करून सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याबाबतचे आदेश दिले आहेत.दोन महिन्यानंतर बाजारपेठ खुलीसोमवारपासून सांगली जिल्हा अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी बाजारपेठ उघडण्यासाठी व्यापार यांची लगबग पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून दुकानांची साफसफाई करण्याचे काम सुरू होते. तर काही दुकानदारांनी आपले व्यवसाय सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळाले. खरेदीसाठीही सांगलीकरांची तुरळक गर्दी रस्त्यावर पाहायला मिळाली. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार यांना 50% आसन क्षमता ठेवून विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सांगलीकर आणि व्यापारयांना मोठा दिलासा मिळाला आहे.यावर मात्र निर्बंध कायमसांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला असला तरी आद्यप कोरोना रुग्णांची संख्या पूर्ण घटली नसल्याने जिल्हा पूर्ण अनलॉक करण्यात आला नाही. गर्दी होण्याची ठिकाण असणारे चित्रपटगृह , शॉपिंग मॉल्स, नाट्यगृह, सभागृह आणि व्हिडीओ गेम, पार्लर, करमणूक ठिकाण यांच्यावरचे निर्बंध कायम आहेत. केवळ उद्यानांना सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
Last Updated : Jun 15, 2021, 12:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details