महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raj Thackeray : राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाने पुन्हा बजवला अजामीनपात्र वॉरंट

मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना शिराळा न्यायालयाकडून ( Shirala Court ) अजामीनपात्र वॉरंट ( non bailable warrant ) बजवण्यात आला आहे. यापूर्वी वॉरंट बजावूनही राज ठाकरे हजर न झाल्याने शिराळा न्यायालयाने पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजवला असून 11 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मनसे नेते शिरीष पारकर हे स्वतः शिराळा न्यायालयात हजर झाल्याने त्यांचा वॉरंट रद्द करण्यात आला. मात्र, राज ठाकरे यांचा वॉरंट रद्द करणार नसल्याचे न्यायालयालयाने सांगितले. यामुळे मनसेच्या वकिलांनी इस्लामपूर न्यायालयात वॉरंट रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली आहे.

By

Published : Jun 9, 2022, 11:11 AM IST

Updated : Jun 9, 2022, 2:59 PM IST

राज ठाकरे यांना वॉरंट
राज ठाकरे यांना वॉरंट

सांगली- मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना शिराळा न्यायालयाकडून ( Shirala Court ) अजामीनपात्र वॉरंट बजवण्यात आला आहे. यापूर्वी वॉरंट बजावूनही राज ठाकरे हजर न झाल्याने शिराळा न्यायालयाने पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजवला असून 11 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर मनसे नेते शिरीष पारकर हे न्यायालयात हजर झाल्याने त्यांचा वॉरंट रद्द करण्यात आला आहे.

राज ठाकरेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हे -2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनातून शिराळा या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान दगडफेक, बेकायदा जमाव जमवणे,अशा पद्धतीचे प्रकार घडल्या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यामध्ये मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, मनसे नेते शिरीष पारकर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. खटल्याची सुनावणी शिराळा जिल्हा शिराळा सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे.



पुन्हा बजावला अजामीनपात्र वॉरंट -दरम्यान, न्यायालयाने तारखेला वारंवार गैरहजर राहिल्या प्रकरणी मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह शिरीष पारकर व अन्य कार्यकर्त्यांना अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाकडून या आधी बजावण्यात आला होता. मात्र, ते हजर झाले नसल्यामुळे न्यायालयाने राज ठाकरे यांना पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे. तर मनसेचे नेते शिरीष पारकर हे पुन्हा न्यायालयात हजर राहिल्याने त्यांचा अजामीनपात्र वॉरंट न्यायलयाने रद्द केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.

नाव काढून टाकण्याची मागणी -मनसेचे वकील रवी पाटील म्हणाले, राज ठाकरे यांचा अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचा अर्ज शिराळा न्यायालयात देण्यात आला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या विरोधात इस्लापूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज (दि. 9 जून) सुनावणी होणार आहे. या गुन्ह्यात राज ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याने या गुन्ह्यातून आरोपी म्हणून त्यांचे नाव वगळावे, अशी मगाणी न्यायालयाकडे करणार असल्याचे वकील रवी पाटील यांनी सांगितलेे.



हेही वाचा -धक्कादायक; जत तालुक्यात प्रेमीयुगलाची आपापल्या घरी विष घेऊन आत्महत्या

Last Updated : Jun 9, 2022, 2:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details