सांगली- शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पाचव्या दिवशीही अतिवृष्टी कायम आहे. रेकॉर्ड ब्रेक असा पाऊस चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडला आहे. पाथरपुंज येथे तब्बल 430 मिमी पावसाची नोंद गेल्या 24 तासात झालेली आहे. तर चांदोली धरणातून 34 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीला महापुर आला आहे. नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात रेकॉर्डब्रेक पाऊस; वारणेला महापूर - महापूर
रेकॉर्ड ब्रेक असा पाऊस चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडला आहे. पाथरपुंज येथे तब्बल 430 मिमी पावसाची नोंद गेल्या 24 तासात झालेली आहे. तर चांदोली धरणातून 34 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे.
शिराळा तालुक्यातील संततधार पाऊस कायम आहे. चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी ही कायम असुन धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज मध्ये 24 तासांमध्ये जवळपास 430 मिमी रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वारणा धरण जवळपास भरले आहे. सध्या 33.89 टीएमसी पाणीसाठा चांदोली धरणात निर्माण झाला आहे. संततधार पाऊस, अतिवृष्टी यामुळे धरणाच्या क्षेत्रात पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन, धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता आणखी वाढवण्यात आला आहे.
सकाळी सात वाजल्यापासून 34 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहेत. त्यामुळे वारणा नदीला आता महापूर आलेला आहे. तालुक्यात पडणारा संततधार पाऊस आणि चांदोली धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वाघा नदीने रौद्र रूप धारण केला आहे. या ठिकाणी असणारे छोटे-मोठे पूल आधी पासून पाण्याखाली आहेत. पुरामुळे शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. कोल्हापूरच्या जवळच असणाऱया गावांचा सुद्धा संपर्क तुटला आहे. या दोन तालुक्यातील बस सेवा ही पाणी आल्याने बंद करण्यात आली आहे. काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संततधार पाऊस चांदोली धरणातून सोडण्यात येणारे पाणी त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.