सांगली -राजेंद्र पाटील (चिकुर्डे) यांची रयत क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी तर मोहसीन पटवेकर (इस्लामपूर) यांची रयत क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
रयत संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर अल्पसंख्याक अध्यक्षपदी मोहसीन पटवेकर - रयत क्रांती संघटना
राजेंद्र पाटील (चिकुर्डे) यांची रयत क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी तर मोहसीन पटवेकर (इस्लामपूर) यांची रयत क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पाटील व पटवेकर यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवड समारंभप्रसंगी उपस्थित सागर खोत, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते मा. लालासो पाटील, रयत क्रांती संघटनेचे राज्य सचिव मा. भास्कर कदम, रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. बजरंग भोसले, रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा. विनायक जाधव, संघटनेचे सांगली जिल्हा युवा अध्यक्ष मा. किरण उतळे, संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा.अरुण गावडे, संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष मा. लालासो धुमाळ, मा. शशिकांत शेळके, रयत क्रांती वाहतूक संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा. महेश माने यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.