सांगली -जिल्ह्यातील सांगलीवाडी येथे आज (सोमवारी) विविध मागण्यांसाठी इस्लामपूर मार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आयर्विन पुलाला पर्यायी पूल तातडीने उभारण्याचे काम सुरु करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. यासाठी आंदोलकांनी तब्बल 1 तास रस्त्यावर ठिय्या मांडला होता. तर माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.
सांगलीवाडीकरांचा एल्गार ! विविध मागण्यांसाठी 'रास्ता रोको' आंदोलन - sangalwadi
सांगली शहरात कृष्णा नदीला आलेल्या पुरानंतर अनेक प्रश्न समोर आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज (सोमवारी) शहरातील सांगलीवाडी येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यासाठी आंदोलकांनी तब्बल 1 तास रस्त्यावर ठिय्या मांडला होता.
सांगली शहरात कृष्णा नदीला आलेल्या पुरानंतर अनेक प्रश्न समोर आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज शहरातील सांगलीवाडी येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. आंदोलनामध्ये सांगली-इस्लामपूर मार्गावर रस्ता रोको करत आयर्विन पुलाशेजारी मंजूर असलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करावे, शहरातून बाहेर पडणाऱ्या रस्त्याची उंची वाढवण्यात यावी आणि आयर्विन पुलाशेजारी बांधण्यात येणाऱ्या पुलापासून उड्डाणपुल बांधण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यासाठी आंदोलकांनी तब्बल 1 तास रस्त्यावर ठिय्या मांडला होता.