महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूरग्रस्तांना 11,500 कोटींची मदत पुरेसी नाही, ही फक्त मलमपट्टी - महादेव जानकर

'महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या पॅकेजमध्ये आणखी वाढ करावी. राज्य सरकारने 11 हजार 500 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र हे पुरेसे नाही. ही फक्त मलमपट्टी करणारी मदत आहे. केंद्रानेही आणखी मदत करावी', अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे.

sangli
sangli

By

Published : Aug 5, 2021, 3:35 PM IST

सांगली -महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजमध्ये आणखी वाढ करावी, अशी मागणी माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. तसेच, ही मदत पुरेशी नसून मलमपट्टी करणारी आहे. केंद्र सरकारनेही आणखी मदत केली पाहिजे, असे मत आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. सांगली जिल्ह्यातल्या बहे या ठिकाणी पूरग्रस्त पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर

'ही तर केवळ मलमपट्टी'

सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी माजी मंत्री व आमदार महादेव जानकर यांनी केली. वाळवा तालुक्यातील बहे येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत जानकर यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. 'महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा महापुराने मोठे नुकसान झाले आहे. यातून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून भरीव मदत झाली पाहिजे. राज्य सरकारने 11 हजार 500 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र हे पुरेसे नाही. ही फक्त मलमपट्टी करणारी मदत आहे. त्यामुळे त्याहीपेक्षा अधिक मदत केली पाहिजे. तसेच केंद्र सरकारनेही 750 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. मात्र नुकसान मोठे असल्याने केंद्राने राज्याला अधिकची मदत द्यावी', अशी मागणी महादेव जानकर यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री आणि केंद्राला याबाबत अहवाल पाठवणार असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले.

'समुद्राला वाहून जाणारे पाणी पाईपलाईनद्वारे द्या'

'वारंवार कृष्णा नदीला महापूर येतो. आम्ही मंत्री असताना देखील पूर पाहणीसाठी आलो होतो. त्यामुळे वारंवार येणाऱ्या आपत्तीबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. कोयना धरणात पाणी सोडल्यामुळेही पूर स्थिती वाढते. त्यामुळे कोयना धरणाचे जे अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जाते, ते राज्य सरकारने पाईपलाईनद्वारे कोकणात आणि दुष्काळी भागात द्यावे. जेणेकरून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि कोकणातून स्थलांतरित होणाऱ्या तरुणांना त्याचा फायदा होईल', अशीही मागणी यावेळी महादेव जानकर यांनी केली.

हेही वाचा -उपराजधानीत कोरोनानंतर डेंग्यूचे थैमान; पंधरा दिवसात १०६४ डेंग्यूचे रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details