सांगली -महानगरपालिकेकडून लोकशाही पंधरवडा निमित्ताने मतदान जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक चित्र आणि रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सांगली शहराच्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकातील कलादालन येथे या रांगोळी आणि पोस्टरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
'लोकशाही पंधरवडा' सांगली महापालिकेकडून रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन - Rangoli and poster exhibit by Sangli Municipal Corporation
लोकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सांगली महापालिकेच्यावतीने लोकशाही पंधरवडा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत गुरुवारपासून सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकातील कलादालन येथे रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हेही वाचा... 'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'
लोकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सांगली महापालिकेच्यावतीने लोकशाही पंधरवडा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत गुरुवारपासून सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकातील कलादालन येथे रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात मतदान जनजागृतीबाबत सुंदर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत. या बरोबरच प्रबोधनात्मक पोस्टरचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. पुढील पाच दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून या पोस्टर आणि रांगोळी प्रदर्शनाचा सर्व मतदार नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले आहे.