सांगली- शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जर कुणी अंगावर आले तर त्याला शिंगावर घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज ग्रामीण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उदगाव येथे सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला.
अंगावर आले तर शिंगावर घेऊ, शेतकरी मागण्यांवरुन राजू शेट्टींचा सरकारला इशारा... - महाराष्ट्र बंद
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, उसाला दर शेतीमालाला हमीभाव आणि केंद्र सरकारचा आरसीएपी कायदा रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ग्रामीण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, उसाला दर शेतीमालाला हमीभाव आणि केंद्र सरकारचा आरसीएपी कायदा रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ग्रामीण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. उदगाव येथे राजू शेट्टी यांच्यासह शेकडो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सांगली-कोल्हापूर मार्गावर ठिय्या मारला होता. सुमारे एक तास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी वाहनांच्या लांबच्या-लांब रांगा लागल्या होत्या.
राजू शेट्टी म्हणाले, आम्हाला कोणालाही वेठीस धरायचे नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. तसेच जाहीर केलेल्या सरसकट शेतकरी कर्जमाफी प्रमाणे शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा झाला पाहिजे, याचबरोबर शेतकरी विरोधी असणारा RCEP कायदा रद्द करण्यात यावा, अशा विविध मागण्या शेट्टी यांनी केल्या. तसेच बरोबर शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जर कोण आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करेल तर त्याला शिंगावर घेऊ, असा गर्भित इशारा शेट्टी यांनी राज्य सरकारला यावेळी दिला आहे.