सांगली - दुष्काळ अतिवृष्टी आणि महापूर यामुळे यंदा शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात उसाचं आणि साखरेचे उत्पादन घटणार आहे. याबरोबर साखर उद्योगही अडचणीत येणार आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने मदत केली पाहिजे. अन्यथा भाजपमधून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरू होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे. 'ईटीव्ही भारत'शी साधलेल्या संवादामध्ये ते बोलत होते.
हेही वाचा - नुकसानीची रक्कम सरकारलाच मनीऑर्डर करणार, अपुऱ्या मदतीबाबत शेतकऱ्याची उद्विग्न भावना
देशात यंदा साखरेचे उत्पादन घटणार आहे. गेल्या वर्षी देशात 321 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. मात्र, यंदा 245 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर देशाची गरज ही 260 लाख टनाची गरज आहे. त्यामुळे सरकारने साखर उद्योग धोरणाबाबत सकारात्मक निर्णय घेतले पाहिजेत. तसेच परदेशातून साखर आयात करता कामा नये. शेतकरी तोट्यात जाणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घेणे गरजेचे असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.