महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून सामाजिक चळवळी दडपण्याचा प्रयत्न - राजू शेट्टी

पोलिसांची भिती निर्माण करून चळवळी दाबवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत असल्याचा आरोप, शेट्टी यांनी केला आहे. तसेच सामाजिक चळवळी करायचे की नाही हे आता जनतेने ठरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेनेचे न्याय करावा, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

राजू शेट्टी

By

Published : Oct 9, 2019, 10:32 PM IST

सांगली- पोलिसांच्या माध्यमातून सामाजिक चळवळी दडपण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून शेट्टी यांनी ही टीका करत जनतेनेच आता न्याय द्यावा, असे आवाहन केले आहे.

राजू शेट्टी

हेही वाचा-ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन

नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली जिल्ह्यातल्या महाजनादेश यात्रेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव यांनी आंदोलन करत कोंबड्या आणि अंडी भिरकावले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेचे कारण देत सांगली पोलिसांनी खराडे आणि जाधव यांना हद्दपार का करू नये ? अशा नोटीसा बजावल्या आहेत. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा-नोबेल २०१९ : जॉन बी. गुडइनफ एम. स्टॅनली व्हिटिंगहम अन् अकिरो योशिनो ठरले रसायनशास्त्रातील नोबेलचे पारितोषिक विजेते!

राज्य सरकार सामाजिक चळवळी दाबण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरुपातले गुन्हे सामाजिक प्रश्नातून केलेल्या आंदोलनामुळे दाखल झालेले आहेत. आपण गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक चळवळ करतोय, तीन मुख्यमंत्र्यांचा काळ आपण अनुभवलेला. मात्र, अशा पद्धतीने दडपशाहीची कारवाई झाली नाही. मात्र, या सरकारला सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाची कारवाई करता येत नाही. त्यामुळे पोलिसांची भिती निर्माण करुन चळवळी दाबवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत असल्याचा आरोप, शेट्टी यांनी केला आहे. तसेच सामाजिक चळवळी करायचे की नाही हे आता जनतेने ठरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेनेचं न्याय करावा, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details