सांगली- देशात खासगीकरणासाठी राज्यकर्ते चळवळी संपवण्याचे कट कारस्थान करत आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तर देशातील केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ धग धरून उभी आहे. बाकी सर्व चळवळी संपल्यात जमा झाल्या आहेत, असे मतही यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. ते सांगलीमध्ये आयोजित कामगार मेळाव्यात बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये बीएसएनएल कंपनी कर्मचाऱ्यांचा कामगार मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार शेट्टी म्हणाले, सामान्यांना आधारवड असणाऱ्या सरकारी कंपन्या एकापाठोपाठ एक विकण्याचा सपाटा सुरू आहे. एअर इंडिया विकली आहे. आता कधी ही बीएसएनएलचा नंबर लागू शकतो. ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी आहे.
हेही वाचा-समीर वानखेडे प्रकरण; तपास यंत्रणांवर दबाव निर्माण करणे चुकीचे- प्रवीण दरेकर