महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raghunath Patil : राज्य सोडून पळून जाऊ नका, बदमाश राज्यकर्ते बदला - रघुनाथदादा पाटील - सदाभाऊ खोत

राज्यातील दूध संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे 8 हजार 370 कोटी रुपयांची लूट केल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर थेट निशाणादेखील रघुनाथदादा पाटील यांनी साधला आहे.

Raghunathdada patil
रघुनाथदादा पाटील

By

Published : Dec 4, 2022, 5:33 PM IST

सांगली : महाराष्ट्रातल्या अनेक सीमा भागातील गाव शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी धरत आहेत, पण त्यांनी दुसऱ्या राज्यात पळून न जाता महाराष्ट्रातल्या बदमाश राज्यकर्त्यांना बदलावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील (Raghunath patil) यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत असताना म्हणाले, महाराष्ट्राची जी आजची अवस्था आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार हे भ्रष्टाचारी कारभार असल्याचा आरोपही शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे.

लूट केल्याचा गंभीर आरोप :राज्यातील दूध संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे 8 हजार 370 कोटी रुपयांची लूट केल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. 27 रुपये दूध दर देण्याची मागणी 2017 मध्ये देण्याचे निर्णय झालेले असताना, त्याला दूध उत्पादक संस्थांना न्यायालयात स्थगिती मिळाली.

कोणाकडूनही दखल घेण्यात आली नाही : 2018 मध्ये 20 रुपये दर आणि 5 रुपये अनुदान देण्याचा नवा निर्णय झाला. तसा जीआर सरकारने काढला पण आज पर्यंत, त्या दरम्यानचा फरक शेतकरयांना देण्यात आला नाही. तो सुमारे 8 हजार 370 कोटी रुपया इतका आहे. याबाबत आता पर्यंतच्या 3 दुग्धविकास मंत्र्यांना भेटलो आहे. मात्र, कोणाकडूनही दखल घेण्यात आली नाही, कारण बहुतांश दूध संस्था आमदार-नामदारांच्या असल्याचा आरोपही रघुनाथ पाटील यांनी केला आहे.


थेट निशाणा : त्याच बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटना या राज्य सरकारच्या पाळीव संघटना असल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर थेट निशाणा रघुनाथदादा पाटील यांनी साधला आहे. उसाची एफआरपी असेल किंवा दुधाचा दर असेल यामध्ये नेहमीच या दोन्ही नेत्यांनी तडजोडी केल्याचा गंभीर आरोपदेखील रघुनाथ पाटील यांनी सांगली मध्ये पत्रकार परिषदेत केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details