महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पाकिस्तान किंवा चीन बॉर्डरवरही अशी परिस्थिती नाही' - sangli farmers news

येत्या सहा फेब्रुवारी रोजी देशव्यापी रस्तारोको आंदोलनात शेतकरी संघटनाही उतरणार असल्याचे जाहीर करत, मोदी सरकारविरोधात सांगलीमध्ये रघुनाथदादा पाटील यांनी एल्गार पुकारला आहे.

raghunath
raghunath

By

Published : Feb 3, 2021, 6:46 PM IST

Updated : Feb 3, 2021, 7:01 PM IST

सांगली - पाकिस्तान व चीन बॉर्डरवरही अशी परिस्थिती नाही, तशी दिल्लीतली शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारने निर्माण केल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. तसेच येत्या सहा फेब्रुवारी रोजी देशव्यापी रस्तारोको आंदोलनात शेतकरी संघटनाही उतरणार असल्याचे जाहीर करत, मोदी सरकारविरोधात सांगलीमध्ये रघुनाथदादा पाटील यांनी एल्गार पुकारला आहे.

शेतकरी संघटनाही उतरणार रस्त्यावर

केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. कृषी कायद्याच्या विरोधात 6 फेब्रुवारी रोजी विविध शेतकरी संघटनांनी देशव्यापी रस्तारोको आंदोलन पुकारला आहे. या आंदोलनाला रघुनाथदादा पाटीलप्रणित शेतकरी संघटनेनेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सांगलीमध्ये शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन देशव्यापी रस्तारोको आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. केंद्रातील मोदी सरकारविरोधात सहा फेब्रुवारी रोजी वाळवा तालुक्यातल्या वाघवाडी फाटा येथील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुपारी 12 ते 3दरम्यान शेतकरी या मार्गावर ठिय्या मारून रास्तारोको आंदोलन करतील आणि मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवतील, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

'पाकिस्तान बॉर्डरवरही अशी स्थिती नाही'

पाटील म्हणाले, की दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत आणि केंद्राने मात्र त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या भोवती तारांचे कुंपण घातले आहे आणि अशी परिस्थिती पाकिस्तान किंवा चीन बॉर्डरवरही नाही, हा सर्व प्रकार अत्यंत खोडसाळपणाचा असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

'ठाकरेंनी आधी राज्यातील भूमिका स्पष्ट करावी'

राज्य सरकारी टीका करताना रघुनाथ पाटील म्हणाले, की राज्यामध्ये अनेक साखर कारखानदारांकडून एफआरपी देण्यात आलेले नाही, त्याचबरोबर दुधालाही योग्य भाव देण्यात येत नाही. उसाचा एफआरपी 14 दिवसात देणे बंधनकारक आहे. मात्र तो कारखान्यांकडून पाळण्यात येत नाही, अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र पंजाबच्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

Last Updated : Feb 3, 2021, 7:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details