महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नरेंद्र मोदींच्या हिशोबात शेती नाही, आत्मनिर्भर भारत पॅकेजवरून रघुनाथदादा पाटलांची टीका - raghunath patil on modi

केंद्र सरकारच्या वतीने 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या पॅकेजवर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी टीका केली आहे.

sangli
रघुनाथ पाटील

By

Published : May 14, 2020, 9:53 PM IST

सांगली - केंद्र सरकारच्या वतीने 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या पॅकेजवर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या हिशोबात आजही शेती दिसत नाही. केवळ उद्योजक आणि पगारदार वर्गावर खैरात करण्यात आल्याची टीका रघुनाथ पाटील यांनी केली.

रघुनाथ पाटील
शेतकऱ्यांचे लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीची नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतीच्या नुकसानभरपाईबाबत आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. उलट आत्मनिर्भर होण्याचे सांगितले जात आहे. शेतकरी हा आधीपासून आत्मनिर्भर आहे. त्याने स्वतः सर्व केले आहे. इतकेच नव्हे तर स्वतःचा हाताने गळफस घेतली आहे. स्वतःची चिता रचत पेटवूनसुद्धा घेतली आहे, त्यामुळे आम्हाला आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता नसल्याचे पाटील म्हणाले. सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये उद्योगपतींना खैरात आणि शेतकऱ्यांसाठी केवळ 31 मे पर्यंत व्याज सूट दिली आहे. पण मुद्दल कोणी भरायची? मुद्दलमुळे सर्व परस्थिती बिघडली आहे. जे क्रेडिट कार्ड सरकारकडून देण्यात येत आहे. त्याची मर्याद किती, आणि ते फेडणार कोण? याची स्पष्टता केली नसल्याचे पाटील म्हणाले.लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तर हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करेल अशी अपेक्षा होती.मात्र, शेतकरी विरोधी धोरण काही बदलेले दिसत नाही. कारण केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये कुठेच नरेंद्र मोदी अथवा अर्थमंत्री यांच्याकडून शेतकरी हिताची घोषणा झालेली दिसत नाही. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून लोक परागंदा होऊन गावाकडे पोहोचत आहेत. गावात आता गर्दी होत आहे, आणि या मजुरांना कामगारांना शमवून घेण्याची क्षमता शेतीत आहे. पण सरकारने शेतकऱ्यांना कर्ज, बियाणे उपलब्ध करून दिले पाहिजेत. तसेच शेतीवरील निर्बंध उठवले पाहिजेत, अशी मागणी यावेळी रघुनाथ पाटील यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details