सांगली - महाविकास आघाडी सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवर शेतकरी संघटनेने जोरदार टीका केली आहे. असमाधानी आणि भ्रमनिरास करणारी ही कर्जमाफी असून शेतकऱ्यांच्या वर असणारे कर्ज हे सरकारचे पाप आहे. त्यामुळे हे पाप सरकारने फेडले पाहिजे, असे मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिला आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर येथे बोलत होते.
शेतकरी कर्जमाफी भ्रमनिरास करणारी, सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन - रघुनाथ पाटील - News about Raghunath Dada Patil
महाविकास आघाडी सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवर शेतकरी संघटनेने जोरदार टीका केली. असमाधानी आणि भ्रमनिरास करणारी ही कर्जमाफी असल्याचे शेतकरी नेते रघुनाथ पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 2015 पासून दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आल्याचे हिवाळी अधिवेशनात जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावर शेतकरी संघटनेने टीका केली आहे. सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा देऊन सर्वांनी मते घेतली. पण देण्याच्या वेळी मात्र 2 लाख पर्यंतची कर्जमाफी केली, पण ही कर्जमाफी असमाधानी आणि भ्रमनिरास करणारी असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. हे टोळ्यांचे सरकार असून, त्यांना कोणतीच विचारधारा नाही, त्यामुळे शेतकरी विरोधी हे सरकार आहे. शेतकऱ्यांच्यावर असणारी कर्जे ही सरकारचे पाप आहे, त्यामुळे ही पाप सरकारने फेडली पाहिजेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे. यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा यावेळी रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.