महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या संकटातही राबणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण द्या - रघुनाथदादा पाटील - शेतकऱ्यांना विमा संरक्षण

कोरोनाच्या या संकटामुळे शेतकरीही मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी पिकांसाठी कोणतेही नियम अटी न लावता पीक कर्ज तातडीने द्यावे. तरच शेती टिकणार आहे, असे मत रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांना विमा संरक्षण द्या
शेतकऱ्यांना विमा संरक्षण द्या

By

Published : Apr 13, 2020, 3:17 PM IST

सांगली- कोरोनाचे सावट डोक्यावर असतानादेखील शेतकरी शेती करत आहेत. धान्य पिकवत आहेत. त्यांनाही जीवाची भीती आहे. त्यामुळे, राज्य सरकारने या शेतकऱ्यांनाही विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

रघुनाथदादा पाटील

कोरोनाच्या या संकटामुळे शेतकरीही मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या शेतीमालाला भाव नाही, उठाव नाही. माल बाजारात जाऊ शकत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांना आपला शेतीमाल फेकून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.त्यामुळे आगामी पिकांसाठी कोणतेही नियम अटी न लावता पीक कर्ज तातडीने द्यावे. तरच शेती टिकणार आहे, असे मत रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details