महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सावरकरांवर खरंच प्रेम असेल तर गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा' - News about the Farmers Association

सावरकर आणि सत्तेवरुन देवेद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा समाचार शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी घेतला आहे.

raghunath-dada-patil-criticized-opposition-leader-fadnavis
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील

By

Published : Dec 16, 2019, 7:50 PM IST

सांगली - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर आणि सत्तेवरून सरकारवर केलेल्या टिकेवरुन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यपालांना रात्रपाळी करायला लावून शपथ घेताना कशाची लाचारी होती. सावरकरांच्यावर एवढंच प्रेम असेल तर त्यांच्या विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाप्रमाणे गोवंश हत्याबंदीचा कायदा रद्द करा, मगच सोयीचे प्रेम दाखवा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील

नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झाली आहे, असे म्हणत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरुन टीका केली होती. या टीकेवरून रघुनाथदादा पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांना लाचार म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना रात्रपाळी करायला लावून राष्ट्रपती राजवट उठवून शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या वरचे सगळे गुन्हे मागे घेऊन क्लिन चिट दिली, मग सत्तेसाठी ही कसली लाचारी होती, असा टोला त्यांनी लगावला.

आज वीर सावरकर यांच्याबद्दल सगळ्यांना प्रेम फुटले आहे. सावरकर हे देशभक्त होते, यांच्यामध्ये कोणती शंका नाही. मात्र, सावरकर यांचा वापर सोयीप्रमाणे करण्यात येत आहे. सावरकर यांचे हिंदुत्व हे प्रखर विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी गायी बद्दल गाय ही उपयुक्त पशु आहे. तिच्या पोटात देव नाहीत, ही भाकड कथा आहे, असे स्पष्ट सांगितले होते. असे विज्ञाननिष्ठ मांडणारे सावरकर जर तुम्हाला अभिप्रेत असतील, तर मग तुम्ही गोवंश हत्या बंदी का केला? असा सवाल रघुनाथदादा पाटील यांनी फडणवीस यांना केला. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा मूर्खतेचा कायदा सावरकरांना अभिप्रेत होता का? त्यामुळे सावरकरांविषयी सोयीचे प्रेम दाखवू नका. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी सावरकरांच्यावर खरंच प्रेम असेल तर विधानसभेत गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details