महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सरकार, कारखानदार अन् राजू शेट्टींकडूनही शेतकऱ्यांची लूट, उसाला 4 हजार दर मिळावा' - रघुनाथदादा पाटील

सरकार, कारखानदार आणि राजू शेट्टी यांच्यासारख्या संघटना शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

रघुनाथदादा पाटील

By

Published : Nov 22, 2019, 5:56 PM IST

Updated : Nov 22, 2019, 6:12 PM IST

सांगली- सरकार, कारखानदार आणि राजू शेट्टी यांच्यासारख्या संघटना शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. तसेच उसाला चार हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला पाहिजे, यासाठी येत्या 12 डिसेंबरला सांगलीत पार पडणाऱ्या शेतकरी मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, अशी भूमिका रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर केली आहे.

रघुनाथदादा पाटील - नेते, शेतकरी संघटना

हेही वाचा -अबब...! कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सापडला साडे सहा फुटांचा नाग

ऊस दरावरून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सरकार, कारखानदार आणि स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशात साखर उत्पादनात अग्रेसर असणारा महाराष्ट्र आता दोन नंबरला गेला आहे. उत्तर प्रदेश हा उत्पादनात आता एक नंबरला पोहचला आहे, तर गुजरात हा महाराष्ट्राच्या पाठोपाठ आहे. या दोन्ही राज्यात उसाला महाराष्ट्रापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या दोन्ही राज्याच्या तुलनेत सगळ्यात कमी दर देण्यात येतो. यामध्ये प्रतिटन 2 हजार रुपयांचा फरक असून, या सर्व गोष्टीला सरकार त्याचबरोबर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व इतर शेतकरी संघटना कारणीभूत आहेत, असा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

हेही वाचा -कोल्हापुरात मटणाचे दर कडाडले, खवय्ये नाराज

आज शेतकऱ्यांच्या सर्वच शेतीमालाचे दर कोसळले आहेत. यामागे सरकार, कारखानदार आणि स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचे कटकारस्थान असून शेतकऱयांना लुटण्याचा हा उद्योग असल्याची टीकाही रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

उसाचा आता हंगाम सुरू होत आहे. यंदा आमच्या ऊसाला 4 हजार प्रति टन भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी असून या मागणीसाठी आणि ऊस आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी हुतात्मा बाबू गेनू आणि शरद जोशी यांचा 12 डिसेंबर रोजी स्मृतीदिन सांगलीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांचा मेळावा पार पडणार असून यावेळी ऊस आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, अशी भूमिका रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर केली आहे.

Last Updated : Nov 22, 2019, 6:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details