महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली महापालिकेने सुरू केलेले भाजीपाला केंद्र रद्द; आता फक्त होम डिलिव्हरी - सांगली महापालिका

सांगली महापालिका क्षेत्रात प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, 18 भाजीपाला खरेदी-विक्री केंद्र सुरू केले होते. मात्र, तरीही नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होताना पाहायला मिळाली. त्यामुळे आता ही तात्पुरती सुरू करण्यात आलेली भाजीपाला केंद्रे बंद करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

queue for vegetable
सांगली महापालिकेचे सुरू झालेले भाजीपाला केंद्र रद्द; आता फक्त होम डिलिव्हरी

By

Published : Mar 25, 2020, 7:53 PM IST

सांगली - कोरोना संचारबंदीत आता साांगली पालिका क्षेत्रात सुरू करण्यात आलेले भाजीपाला केंद्र रद्द करण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनी होम डिलिव्हरी सेवा सुरू केली असून त्याचे हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना घरातून केवळ ऑर्डर दिल्यास गरजेच्या वस्तू मिळणार आहेत.

ऑर्डरसाठी संपर्क क्रमांक

संचारबंदी काळात अत्यावश्यक सुविधा नागरिकांना मिळणार असल्याचे प्रशासनाकडून वारंवार जाहीर करण्यात आलेले आहे. सांगली महापालिका क्षेत्रात प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, 18 भाजीपाला खरेदी-विक्री केंद्र सुरू केले होते. मात्र, तरीही नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होताना पाहायला मिळाली. त्यामुळे आता ही तात्पुरती सुरू करण्यात आलेली भाजीपाला केंद्रे बंद करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

पालिकेकडून आता घरपोच सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे प्रभाग निहाय नियोजन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सांगली पोलिसांनी याआधीच ही गर्दी टाळण्यासाठी घरपोच अत्यावश्यक सेवा सुरू केली आहे. यासाठी त्यांनी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. किराणामाल, भाजीपाला, औषध, दूध इत्यादी अत्यावश्यक सेवा घरपोच मिळणार आहेत. त्यामुळे सांगलीकर शहरवासीयांनी अत्यावश्यक सेवेबाबत घाबरून न जाता निश्चित राहून दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या गरजेप्रमाणे वस्तू मागाव्यात, असे आवाहन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले आहे. ही सेवा पुरवण्यासाठी शहरातील दुकानादार सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांची मदत घेण्यात येत असून, प्रभाग निहाय त्या सेवा पुरवण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details