महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहावीमध्ये सर्व विषयात '३५ गुण' घेऊन उत्तीर्ण; सर्वांना आश्चर्याचा धक्का - 10 th result

साक्षी ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिने परिक्षेसाठी सर्व विषयाचा अभ्यास केला. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची आशा तिला होती. मात्र, प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर तिला पडलेले गुण बघून तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला.

साक्षीची गुणपत्रिका

By

Published : Jun 10, 2019, 10:01 AM IST

सांगली- शहरातील साक्षी राजपूत ही विद्यार्थीनी दहावीत सर्व विषयात ३५ गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तिला पडलेले गुण बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच तिच्या या मॅजिक यशाचे सर्वत्र कौतुकदेखील केले जात आहे.

दहावीत सर्वच विषयामध्ये ३५ घेऊन उत्तीर्ण होणारी साक्षी

साक्षी ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. ती शहरातील एम्यान्यूल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होती. तिने परिक्षेसाठी सर्व विषयाचा अभ्यास केला. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची आशा तिला होती. मात्र, प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर तिला पडलेले गुण बघून तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. अभ्यास करूनही कुठेतरी कमी पडल्यामुळे कमी गुण मिळाले. मात्र, उत्तीर्ण झाल्याचा आनंद असल्याचे साक्षी म्हणाली. तसेच चांगला अभ्यास करून बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार असल्याचा विश्वास साक्षीने व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details