महाराष्ट्र

maharashtra

"गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत"

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना आज मंत्रालयातून पाठवण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

By

Published : Apr 22, 2020, 11:39 PM IST

Published : Apr 22, 2020, 11:39 PM IST

VISHWAJIT KADAM
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम

सांगली -लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या अनेक जिल्ह्यातील शेतीचे या महिन्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. यासंदर्भात सदरील नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना आज मंत्रालयातून पाठवण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आपत्ती काळात मदत व्हावी, याकरिता कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी, हे आदेश निर्गमित व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या आपत्तीत पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करावेत. ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार योग्य ती मदत मिळावी, यासाठी सविस्तर अहवाल (अ ब क ड) नमुन्यामध्ये कृषी आयुक्त यांच्यामार्फत शासनास पाठवावा. अशा सूचना देण्यात आल्याची माहितीही मंत्री कदम यांनी दिली आहे. त्याच बरोबर फेब्रुवारी व मार्च महिन्यातही गारपीट आणि अवेळी पावसामुळे शेत पिकाचे नुकसान झाले होते. त्यांचा समावेश या आदेशामध्ये असल्याचे मंत्री कदम यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details