महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकीय महाभारतीसाठी भाजपाकडून 'टॅक्स टेरेरिझम'चा वापर - पृथ्वीराज चव्हाण - Sarfaraj Sanadi

भाजपकडून राजकीय नेत्यांच्या वर आता टॅक्स टेरेरिझम सुरू आहे. या कर आतंकवादाच्या माध्यमातून भाजपात महाभरती सुरू आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सांगलीत आयोजित काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

By

Published : Aug 3, 2019, 6:35 AM IST

सांगली- भाजपकडून राजकीय नेत्यांच्या वर आता टॅक्स टेरेरिझम सुरू आहे. या कर आतंकवादाच्या माध्यमातून भाजपात महाभरती सुरू आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सांगलीत आयोजित काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते.

राजकीय महाभारतीसाठी भाजपाकडून 'टॅक्स टेरेरिझम'चा वापर


सांगलीच्या पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांची नुकतीच काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्ताने सांगली काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांच्या सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह आमदार मोहनराव कदम, कोल्हापूरचे माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार जयकुमार गोरे, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा मनीषा रोटे यांच्यासह सांगली महापालिकेतील नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विश्वजीत कदम यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना भाजपकडून वेगवेगळ्या पक्षातले आमदार फोडून आपल्या पक्षात घेण्यात येत आहे. हा पक्षांतर कायद्याचा भंग असून भाजपाकडून हा राजकीय भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.


केंद्र सरकारकडून व्यापाऱ्यांच्या विरोधात कर वसुलीचा आतंकवाद सुरू आहे. ईडी ,इन्कम टॅक्स आणि विविध करांच्या नावाखाली तुरुंगात टाकण्याचे भीती दाखवून कर गोळा करण्यात येत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई उद्योगपती सिद्धार्थ यांची आत्महत्या ही जिवंत उदाहरण आहे. आता हा आतंकवाद विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्यांच्यावर राबवण्यात येत आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांच्या सहकारी, खासगी संस्थांच्यावर इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय यांचे छापे टाकले जात आहेत. या टॅक्स आतंकवादाच्या माध्यमातून भाजपात महाभरती सुरू आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे. तसेच आज या प्रकारामुळे लोकशाही धोक्यात आली असून ती वाचवण्याची जवाबदारी सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details