सांगली - मांगले गावातील एका खासगी डॉक्टर व त्यांचा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या भावाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित डॉक्टरच्या जवळच्या तिघांना मिरज येथे हलवण्यात आले आहे. तसेच अन्य संपर्कातील 12 जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.
शिराळा तालुक्यातील खासगी डॉक्टरला कोरोनाची लागण... - खासगी डॉक्टरला कोरोना
मांगले गावातील एका खासगी डॉक्टर व त्यांचा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या भावाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनाबाधित डॉक्टरच्या भावाच्या संपर्कातील लोकांचाही शोध तातडीने सुरू करण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेले कर्मचारी, तसेच रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. सकाळी तहसीलदार गणेश शिदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रविण पाटील, सरपंच मिना ब्रेद्रे उपसरपंच धनाजी नरूटे यांनी भेट देऊन बाजार पेठेपासून शंभर मिटर भाग सील केला आहे. त्यामुळे मांगले गावातील 15 हजार लीटर दूध संकलन ठप्प झाले आहे. त्याचबरोबर बियाणे, खत दुकाने बंद असल्यामुळे लोकांची गैरसोय झाली आहे.