महाराष्ट्र

maharashtra

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक: सांगलीत मतदानाची तयारी पूर्ण, १९१ मतदान केंद्रांची नियुक्ती

By

Published : Nov 30, 2020, 6:45 PM IST

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीतील प्रमुख पक्षांचे उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील असल्याने जिल्हा प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. 191 मतदान केंद्र यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांच्यात काट्याची लढत आहे.

Graduate Constituency Voting Sangli News
सांगलीत मतदानाची तयारी पूर्ण

सांगली - पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीतील प्रमुख पक्षांचे उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील असल्याने जिल्हा प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. 191 मतदान केंद्र यासाठी नियुक्त करण्यात आले असून, मतदान साहित्य, कर्मचारी हे बूथवर रवाना झाले आहेत.

माहिती देताना मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे

मतदान प्रकियेसाठी प्रशासन सज्ज

मतदान प्रक्रियेसाठी सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक आणि जिल्हा प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. मतदानासाठी जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये 191 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी 134 बूथ, तर शिक्षक मतदारसंघासाठी 48 बूथ निर्माण करण्यात आले आहेत. आणि प्रत्येक विभागातून मतदानाचे साहित्य, अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस हे मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.

मतदान करताना कोरोनाची काळजी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने बूथवर असणारे अधिकारी, कर्मचारी यांना पीपीई किट, मास्क, सॅनिटाईझर आणि थर्मल स्कॅन मशीनही पुरवल्या आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच जिल्ह्यातील

पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख, महाविकास आघाडीकडून अरुण लाड आणि जनता दलाकडून प्राध्यापक शरद पाटील हे प्रमुख उमेदवार आहेत. यामध्ये भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांच्यात काट्याची लढत आहे. शिवाय, जिल्ह्यातील अनेक अपक्ष उमेदवारसुद्धा निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा -अवघ्या 12 तासात चोरीचा छडा, दोघांना अटक करत 67 हजारांचा मुद्देमाल हस्तगत..

ABOUT THE AUTHOR

...view details