महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहा फूट खोल गटारात पडलेल्या गाभण म्हशीची सुखरूप सुटका - सांगली लेटेस्ट न्युज

शहरातील शंभर फुटी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका गटारात सकाळच्या दरम्यान एक म्हैस पडली. १० फूट खोल आणि ६ फूट रुंद असणाऱ्या या गटारात पडल्याने म्हैस बिथरली होती. परिसरातील नागरिकांना म्हैस गटारात पडल्याचे दिसताच त्यांनी प्राणीमित्र आणि महापालिका प्रशासनाला याची माहिती दिली.

pregnant buffalo rescue sangli  sangli latest news  sangli buffalo rescue news  सांगली लेटेस्ट न्युज  सांगली म्हैस बचावकार्य न्युज
दहा फूट खोल गटारात पडलेल्या गर्भवती म्हशीची सुखरूप सुटका

By

Published : Jun 6, 2020, 4:52 PM IST

सांगली - शहरातील एका भल्या मोठ्या गटारात पडलेल्या म्हशीला रेस्क्यू ऑपरेशन करत बाहेर काढण्यात आले आहे. प्राणीमित्र आणि पालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने जेसीबीच्या माध्यमातून गाभण असलेल्या म्हशीची सुखरूप सुटका करण्यात आली. तब्बल तीन तास हे बचावकार्य सुरू होते.

दहा फूट खोल गटारात पडलेल्या गर्भवती म्हशीची सुखरूप सुटका
शहरातील शंभर फुटी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका गटारात सकाळच्या दरम्यान एक म्हैस पडली. १० फूट खोल आणि ६ फूट रुंद असणाऱ्या या गटारात पडल्याने म्हैस बिथरली होती. परिसरातील नागरिकांना म्हैस गटारात पडल्याचे दिसताच त्यांनी प्राणीमित्र आणि महापालिका प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर राहत ॲनिमल संस्थेचे पथक आणि सांगली महापालिका अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गटारात पडलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू झाले. गटारीमध्ये उतरत दोरीच्या साह्याने पहिल्यांदा म्हैशीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये यश आले नाही. त्यानंतर याठिकाणी जेसीबी-क्रेन आणण्यात आली. अथक प्रयत्नानंतर गर्भवती म्हशीला बाहेर काढण्यात यश मिळाले. तब्बल तीन तास महिलेची म्हशीची सुखरूप सुटका करण्यासाठी बचाव कार्य सुरू होते. अखेर प्राणीमित्र आणि महापालिकेमुळे त्या म्हशीला जीवदान मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details