सांगली -शहरासह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारनंतर शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस पडला आहे. विजांच्या कडकडाटासह दुपारनंतर मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली, सायंकाळपर्यंत कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस सांगली शहरासह परिसरात पडत होता. या पाऊसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
सांगलीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी - मान्सूनपूर्व पावसाची सांगलीत हजेरी
सांगलीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
मान्सूनपूर्व पाऊसाची दमदार हजेरी -
10 जूननंतर मान्सूनचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे. सांगलीमध्ये बुधवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला, आणि पावसाच्या मोठ्या सरी अचानक कोसळू लागल्या. जोरदार पाऊस सांगली शहरासह परिसरात पडला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला आहे. कमी अधिक प्रमाणात दुपारनंतर सायंकाळपर्यंत हा पाऊस पडत होता. या पावसामुळे शहरातील वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.