महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प - sangli rain updates

वाळवा तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे महामार्गावरील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे महामार्गावरी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

By

Published : May 15, 2020, 10:12 AM IST

Updated : May 15, 2020, 11:26 AM IST

सांगली -येथील वाळवा तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी महामार्गावरील काही झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर, कणेगाव चेक पोस्टवरील छत उडून गेल्याने साहित्याची मोडतोडही झाली.

वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे मुळापासून उन्मळून पडली. तर, काही ठिकाणी घरावरील पत्रेही उडून गेल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कणेगाव चेक पोस्टच्या मंडपावरील छत उडून गेल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. तर, महामार्गावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन ते तीन तास पडणाऱ्या पाऊसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. यामुळे दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. तर हा पाऊस शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या मशागतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.

Last Updated : May 15, 2020, 11:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details